केज भूषण जनतेचा अधिकारी पुरस्कार जाहीर!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
धाडसी कार्यवाह्या करून गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा आणि सन्मानाचा "केज भूषण जनतेचा अधिकारी" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आपल्या कार्य कर्तृत्वाने संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारे केज पोलीस उपविभागीय कार्यालयाचे आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने "केज भूषण जनतेचा अधिकारी" हा सन्मान देऊन गौरव करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या कार्याने केजचे नांव सर्वदूर पोहोंचवले आहे. केजचे नांव उंचावणारी देशाची कोणीही व्यक्ती केज साठी भूषण आहे.
म्हणून त्यांना १९ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव काळात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून हस्ते या पुरस्काराचे वितरण करून सन्मानानीत करण्यात येणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने अध्यक्ष रोटरॅक्ट बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले व प्रोजेक्ट चेअरमन प्रकाश कामाजी यांच्या वतीने देण्यात आली आहे.

