अजोती गावच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदी सौ रूपाली नगरे यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील आजोती गावातील सौ. रूपाली नगरे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस आजोती गावच्या महिला अध्यक्षपदी निवड इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी केली असून सदर निवडीचे पत्र नगरे यांना (दि.१३ फेब्रुवारी २०२२) रोजी छायाताई पडसळकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी सौ. रुपाली नगरे यांची आजोती गावच्या महिला अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी संजय दरदरे सरपंच आजोती सुगांव। ,सुरेश दरदरे राष्ट्रवादी उपाध्यक्ष , मोहन दरदरे , पिंटू शिंदे , गुलाब दरदरे , उमेश दरदरे, महादेव वाघमोडे , राजेंद्र सलंपुरे, दादा सलंपुरे , जालिंदर नगरे, रमेश खानेवाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याचा विचार करून आजोती गावच्या महिला अध्यक्षपदी निवड केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांचे सामाजिक समतेचे व महिला सक्षमीकरणाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी चे काम आपल्याला महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करावयाचे आहे .महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, भारतीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला संघटन मजबूत करण्यासाठी आपले संपूर्ण सहकार्य व योगदान मिळेल या अपेक्षेने आपली निवड करण्यात आली असल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.

