shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंद सेवा मंडळ पदाधिकाऱ्यांकडून भि.रा.खटोड कन्या विद्यालयातील अटल लॅबची पाहणी..!

श्रीरामपूर (प्रतिनिधी):- येथील भि.रा.खटोट कन्या विद्यालयात हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अटल लॅबची पाहणी करण्यात आली, 
सोबतच विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणासोबतच त्यांच्या उपलब्ध सुविधेबाबतही बारकाईने लक्ष देत विद्यार्थी,शिक्षकांशी वार्तालाभ करुन समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे सहसचिव व विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, मंडळाचे सहसचिव व शां.ज.पाटणी विद्यालयाचे चेअरमन अनिल देशपांडे,क.जे.सोमय्या विद्यालयाचे चेअरमन पुरुषोत्तम मुळे,ज्यू कॉलेजचे चेअरमन श्री.चंद्रकांत सगम,नाईट हायस्कुलचे चेअरमन दिपक कुऱ्हाडे ,स्कूल कमिटी सदस्य विजय नगरकर साहेब, माणिकराव जाधव,हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचे अध्यक्ष अधिक जोशी सर, विद्यालयाच्या प्राचार्या सौ.विद्या कुलकर्णी, शिक्षक सेवक प्रतिनिधी नवनाथ जंगले सर,पतपेढीचे संचालक सतिश म्हसे सर, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.मंगला डोळस, शां.ज.पाटणी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.घोलप ,श्री.पवार सर, आदी उपस्थित होते.
close