तरुणांनी केले रक्तदान ; ही तर सुरुवात आहे ...
प्रतिनिधी : आसावरी वायकर
कोथुळ : २० / श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ गावाने दरवर्षी होणाऱ्या शिवजयंती पेक्षा चांगला उपक्रम राबवला. डीजे व मिरवणूकीला प्राधान्य न देता ऋण फाऊंडेशन ची स्थापना" करून बुधभूषण फाऊंडेशनच्या च्या मार्गदर्शनाखाली ,कोथुळ गावातील तरुणांनी रक्तदान शिबिर व सोबत कु. ज्ञानेश्वरी रामचंद्र पाचुणकर यांचे व्याख्यान घेऊन आदर्श शिवजयंती साजरी केली .
या कार्यक्रमात पोलीस ( psi) दुधाळ साहेब यांची उपस्थिती लाभली व तसेच पोलीस विनोद पवार ,होमगार्ड जगताप यांनीसुद्धा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून आम्हाला प्रोत्साहन दिले. व मराठी शाळेतील मुख्याध्यापक व बाकीच्या शिक्षकांनी देखील उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली .
ऋण फाऊंडेशन ने आदर्श शिवजयंती साजरी करून "ही फक्त एक सुरुवात आहे !! अशा पद्धतीने आदर्श कामाची व आदर्शगाव बनवायची पुढची वाटचाल सुरू केली .

