shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रालयच्या वतीने शिवजयंती मोठया उत्सहात साजरी ...

अभिनेत्री आशु सुरपुर यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय

प्रतिनिधी : आसावरी वायकर

बार्शी : २०  /  बार्शी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणारे राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रालय यांच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल ,शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर , अभिनेत्री आसू सुरपूर, शहर प्रमुख दीपक भैय्या आंधळकर, नागेश अण्णा अक्कलकोटे , ॲड .सुप्रिया गुंड पाटील , बार्शी शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.

 अभिनेत्री आसु सुरपुर यांच्याकडून किराणा किट वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण जीवन प्रवास बघता प्रजेबद्दल असलेले प्रेम स्त्रीयांबद्दल असलेला आदर व सर्व जाती धर्मांबद्दलचा आदरभाव आपण यातून काहीतरी शिकले पाहिजे .

 माजी मंत्री दिलीप सोपल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले छत्रपती महाराज हे उत्तम असे कुशल राजकारणी व शिस्तप्रिय राजे होते . जीवनात मोठा कठीण प्रसंग आला तरी स्वतःवर विश्वास डगमळू द्यायचा नाही हे  छत्रपती शिवाजी महाराज कडून शिकण्यासारखे आहे . भाऊसाहेब आंधळकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळाला भेट दिली सर्व मान्यवरांचा  माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर  इब्राहिम  काझी आदी मान्यवर उपस्थित होते मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमासाठी अथक परिश्रम बालाजी कॉलनी अध्यक्ष सगीर सय्यद उपशहर प्रमुख इलियास शेख इरफान बागवान संतोष भाऊ यांनी परिश्रम घेतले .
close