प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा : २० / करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ढोकरी गावचे सर्व ग्रामस्थ, बुधराणी हाॅस्पीटल पुणे व आरोग्यम धनसंपदा फौंडेशन आणि मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा यांच्या संयुक्त सहभागातून डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शिवाजीराव बंडगर सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिनाथ चे माजी संचालक भारत साळुंके, दत्ता बापू देशमुख, सुधीर बापू देशमुख, पै. शिवाजी खरात, शेतकरी संघटनेचे हनुमंत यादव, वांगी 1 चे सरपंच विठ्ठल शेळके, गणेश पाटील, प्रगतीशील बागायतदार अर्जुन तकीक , हनु यादव , माजी सरपंच शंकर खरात , माजी सरपंच विठोबा सलगर, भारत सलगर , सरपंच प्रतिनिधी किरण बोरकर, उपसरपंच प्रतिनिधी दत्ता खरात, पांडुरंग गडदे, देविदास पाटील, अनिल वळसे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर म्हणाले की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता समाजासाठी आपण निरपेक्ष भावनेने काम केले पाहिजे. गोरगरिबांची सेवा करणे आणि त्यांना आरोग्य सुविधा पुरविणे यासाठी आपण तन-मन-धनाने काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. काही लोक फक्त निवडणूकीच्या वेळीच सर्वसामान्य जनतेच्या प्रती केवळ कळवळा दाखवतात आणि इतर वेळी त्यांना वार्यावर सोडतात हे मला आवडत नाही.
प्रत्येकाने आपापल्या परीने कार्य केले तर समाजाच्या सर्व अडचणी दूर होतील यात शंकाच नाही. बुधराणी हाॅस्पीटल चे डाॅक्टर मोहंमद ठासरावाला यांनी प्रत्यक्ष डोळे तपासणी केली. तर दिनेश जैन यांनी त्यांना सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रयत्न केले.
या प्रसंगी ढोकरी , भिवरवाडी, बिटरगाव वांगी परिसरातील 74 लोकांनी या शिबीराचा लाभ घेतला यापैकी 11 जनांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधरानी हाँस्पिटल कोरेगाव पार्क पुणे येथे पाठविण्यात येणार आहे तर 42 जणांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष किसन कांबळे सर यानी प्रास्ताविक केले तर शुभम बंडगर यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले.

