shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मराडेवाडी रुईच्या चेअरमनपदी सदाशिव मराडे तर व्हा चेअरमन पदी भारत भिकू सोनवले यांची निवड

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी  मराडेवाडी रुईच्या चेअरमनपदी सदाशिव मराडे तर व्हा चेअरमन पदी भारत भिकू सोनवले यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील मराडेवाडी रुई येथील श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या सोसायटीचे नूतन संचालक मंडळ २०२२ ते २०२७ चे निवडणूक प्रक्रिया सोसायटीचे संस्थापक बबनराव रंगनाथ लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध(दि.१६ फेब्रुवारी २०२२) रोजी पार पडली.

 यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस .पी. देवकर यांनी काम पाहिले. 

या सोसायटीच्या चेअरमन पदी सदाशिव सुभाष मराडे, व्हाईस चेअरमन पदी भारत भिकू सोनवले तर संचालक  पदी अशोक रंगनाथ लावंड, विठ्ठल नारायण सोनवले, नामदेव श्रीरंग मारकड ,विठ्ठल चंदू लावंड, सतीश उद्धव व्यवहारे ,जगन्नाथ पांडुरंग मराडे, महादेव वामन कोकणे ,सौ .सिंधुबाई अजिनाथ लावंड, सौ. सविता बापू लावंड, श्रीमती मनिषा संजय आगवणे,
यांची निवड करण्यात आली सदर निवड झाल्यानंतर संस्थापक बबनराव लावंड यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . यावेळी सचिव
 राहुल बाळासो भोसले  व ग्रामस्थ उपस्थित होते.
close