shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री बाबिर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी महादेव लावंड तर व्हाईस चेअरमन पदी भारत लवटे यांची निवड.

श्री बाबिर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी महादेव लावंड तर व्हाईस चेअरमन पदी भारत लवटे यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील श्री बाबिर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. थोरातवाडी रुईच्या सोसायटीचे संस्थापक चेअरमन बबनराव रंगनाथ लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक बिनविरोध(दि. १८ फेब्रुवारी२०२२) रोजी पार पडली.

 यामध्ये चेअरमन पदी महादेव बाबासो लावंड तर व्हा चेअरमन पदी भारत बाबू लवटे यांची निवड करण्यात आली. श्री बाबिर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी यशवंत तात्या कचरे, ज्योतीराम जनार्दन लावंड, नवनाथ आत्माराम व्यवहारे, बापू दादा लावंड, विश्वास आण्‍णासो लावंड, तुळशीराम सिताराम लावंड , हैबती सर्जेराव मारकड, प्रदिप महादेव लावंड ,सौ सावित्रा नानासो लावंड, सौ रंजना अशोक लावंड यांची नुतून संचालक मंडळ २०२२ ते २०२७ पर्यंत निवड करण्यात आली.
 सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेस निवडणूक अधिकारी म्हणून एस, पी, देवकर यांनी काम पाहिले. निवड केलेल्या सर्व संचालक मंडळाचे संस्थेचे संस्थापक चेअरमन बबनराव रंगनाथ लावंड यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोसायटीचे सचिवराहुल बाळासो भोसले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
close