नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते महिला व दिव्यांग बचत गटांना स्टेट बँक ऑफ इंडिया इंदापूर यांच्या वतीने एकूण ११ लाख रुपयांचे कर्ज मंजूर पत्राचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील महिला व दिव्यांग बचत गटांना स्टेट बँक ऑफ इंडिया इंदापूर यांच्या वतीने एकूण ११ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्याचे वितरण इंदापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या वेळी शहरातील कुरेशी महिला बचत गट १ लक्ष, व्यंकटेश्वर दिव्यांग बचत गट १ लक्ष, संत सखुबाई महिला बचत गट २ लक्ष विघ्नहर्ता महिला बचत गट ४ लक्ष, संघर्ष महिला बचत गट १ लक्ष,महिला बचत गट २ लक्ष.
या वेळी सर्व बचत गटांच्या प्रतिनिधींना कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, स्टेट बँक शाखा अधिकारी नंदकिशोर, कर्ज वितरणाचे दुर्गाडे , चोरमले साहेब, बाळासाहेब बोंगाणे व बंडगर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सुभाष ओहोळ ,समुदाय संघटक
श्रीमती योगिता सरगर व अल्ताफ पठाण यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे समुदाय संघटक योगिता सरगर यांनी आभार व्यक्त केले.

