१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हमला मध्ये भारतीय लष्कराचे ४१ जवान शहीद झाले होते .त्या शूर वीर जवानांना इंदापूर येथील शहीद स्मारक या ठिकाणी विविध माजी सैनिक संघटना व नागरिकांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले.
इंदापूर प्रतिनिधी: १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हमला मध्ये भारतीय लष्कराचे ४१ जवान शहीद झाले होते .त्या शूर वीर जवानांना आज (दि.१४)नगरपरिषद इंदापूर याठिकाणी जय हिंद माजी सैनिक संघटना, इंदापूर तालुका त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर ,इंदापूर सायकल क्लब शिवभक्त परिवार इंदापूर व समस्त इंदापूरकर तसेच माजी सैनिक मित्रपरिवार इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कैलास गवळी , युवा क्रांती प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत सिताब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तालुकाध्यक्ष रविराज पवार त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शेवटी जन गण मन सर्वांनी एका तालात सुरात म्हणून भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत कार्यक्रमाला पूर्णविराम दिला.

