shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ओम महिला प्रसारक मंडळाच्या वतीने मोफत गर्भाशय तपासणी शिबिर संपन्न


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १८/ करमाळा शहरात छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त ओम महिला कला क्रिडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा वतीने मोफत गर्भाशय तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले. सदर तपासणी शिबिर हे डॉ कविता कांबळे स्त्री रोगतज्ञ करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

  शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले.  महिलांनी आपल्या आरोग्य संदर्भात काळजी घ्यायला हवी. खूप जास्त आजार बळाल्यावर दवाखाना गाठणे हे चुकीचे आहे. वेळीच दक्षता घेणे केव्हाही चांगले असे मत अंजली श्रीवास्तव यांनी मांडले. महिला आपल्या आरोग्याकडे फार गांभीर्याने पहात नाही ही शोकांतिका ही व्यक्त केली. आणखी मोठ्या प्रमाणात  आरोग्याच्या विविध समस्याना घेऊन मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची मोफत आरोग्य शिबीरं ओम महिला मंडळ द्वारे राबवणार आहोत असे मत डॉ कविता कांबळे यांनी मांडले. जयश्री वीर, रेशमा जाधव यांनी ही महिला आरोग्य संदर्भात आपले विचार मांडले.

 सदर शिबिरात २० महिलांनी सहभाग नोंदविला.दुस-या दिवशी ही आणखी ३५ महिलांची तपासणी झाली.एकूण पंचावन्न महिलांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी जगातील एक अत्याधुनिक मशीन द्वारे केली गेली तपासणी दरम्यान आठ महिलांच्या तपासणीत दोष आढळून आला. लगेच उपचाराने पिशवी न काढता तो बरा होऊ शकतो. मुख्याध्यापिका जयश्रीताई वीर,रेशमा जाधव, ज्योती पांढरे, मितवा श्रीवास्तव इ पदाधिकारी शिबिरास उपस्थित होते. मितवा श्रीवास्तव यांनी सहभागी महिला शिबिरार्थींचे आभार मानले. कृष्णा हॉस्पिटल चे सर्व  स्टाफ व सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले.
close