shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फारच दिवसांपासूनची मनी होती हुरहुर !अकोलेकरांसाठी आता नाही मुंबई दुर !! सागर नेहे यांच्या परिश्रमाला यश आले !आणि अकोले -ठाणे मार्ग मोकळे झाले !!

श्रीरामपूर (प्रतिनिधी):- सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरावे असे कौतुकास्पद कार्य अकोले तालुक्यातील भुमिपूत्र तथा तरुण युवक श्री.सागर परशुराम नेहे या युवकाचे केले आहे,संपुर्ण अकोले तालुक्याने आभार माणून या युवकाचा आदर्श घेण्याची नितांत गरज आहे.
सागर नेहे हे स्वतःच्या व्यवसायानिमीत्त ठाणे - मुंबई येथे वास्तव्यास असताना आपल्या मातीशी इमान राखत या युवकाने आपल्या जनसंपर्काच्या बळावर ठाणे (शहापूर मार्ग) अकोले, घाटघर-शेंडी,भंडारदरा अशा शाॕर्टकट मार्गाच्या मंजुरीसाठी एक तप एकाकी संघर्ष केल्याने नुकताच झालेल्या कालच्या पावसाळी आधिवेशनात या मार्गासाठी मोठी आर्थिक तरतुद करण्यात आली.


सलग १२ वर्ष, सरकार आणि प्रशासनाशी सनदशीर मार्गाने एकाकी झुंज देवून अकोले तालुक्यात विकासाकरीता अकोलेकरांसाठी लढणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने जिंकणाऱ्या तरुणास आज मानाचा मुजरा, स्वतः जाणीवपुर्वक कार्य सिद्धीस नेण्यासाठी पडद्याआड राहुन अकोले तालुक्याच्या विकासासाठी व दळनवळणाच्या सोईसाठी अहोरात्र झटतो आहे. या तरुणाचे नाव नाही घेतले तरी आज अकोलकर आणि वाचनाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे नाव आहेच,सगळ्यांना तो चांगला माहित आहे,परंतु तो ठाणे- मुंबईला आपल्या व्यावसायानिमित्त राहत असल्याने फारसे त्याला कोणी पाहिले अथवा प्रत्यक्षात भेटलेले नाही,नॅशनल मीडियाचा योग्य वापर करून,सामाजिक कार्य समजवून सांगून नेहेमीच, सताधाऱ्यासह विरोधकांनाही प्रेमात पडायला भाग पाडणारा आणि अकोले- मुंबई हे अंतर ६ तासावरून ३ तासावर आणून ठेवणारा हा तरुण,ज्याने अकोल्यातील युवा शक्ती व शेतकरी आणि कामगार वर्ग यांच्या भविष्याचा विचार करून तथा दूरदृष्टी ठेवून एकला चलारे चा मार्ग अवलंबला आणि मिळेल तो धागा पकडत यशाचे शिखर गाठले,ज्याने उभी हयात मुंबई - अकोले शाॕर्टकट मार्ग बनवण्यासाठी घालवली असा अकोले तालुक्याचा हिरा सागर नेहे सर्व अकोलकरांच्या गळ्यातील तावीतच बनला.म्हणून आज त्याचे कितीही अभिनंदन केले तरी ते कमी पडणार आहे.

आज हा अर्थसंकल्पामध्ये पारित केलेला निधी टप्याटप्याने कामाच्या प्रगती नुसार वर्ग केला जाणार आहे, आणि सलग १२ वर्ष उराशी बाळगून असलेल्या युवकाचे स्वप्न देखील साकारले जाणार आहेत,त्याजबरोबर अकोलेकरांसाठी प्रगतीचा एक नवा इतिहास लिहिला जाणार आहे, जो येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी अमूल्य असा ठरणार आहे.आज जिल्हा मार्ग बनला आहे, पुढे राज्यमार्ग बनण्याचे दरवाजे खुले होणार, सोबतच जर केंद्र अणि राज्य यांचे योग्य समनवय साधले गेल्यास  राज्य मार्ग MH (sh) 44  हा राष्ट्रीय मार्ग NH 44 देखील बनण्यास जास्त विलंब लागणार नाही.

सर्वच सत्ताधारी,विरोधक विद्यमान,आजी,माजी आमदार,मंत्री मह़दय ते मुख्यमंत्री दोन वेगवेगळ्या काळातील शासनातील प्रशासकीय अधिकारी आणि संपूर्ण वेगवेगळे राज्यकर्ते या सर्वांना भेटून, कनेक्टिव्हिटीचे महत्व समजावून, बरोबर घेऊन वेळ अखंड एक तप (फॉलोअप) योग्य पाठपुरावा या तरुणाने केला आहे, त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे १२ वर्ष ठाणे- शहापूर (भंडारदरा, शेंडी, राजूर आणि अकोले) या दोन्ही भागात जाऊन या मार्गविषयी समाजामध्ये मोठी जनजागृती करून शासन आणि प्रशासनाला याचे महत्त्व पटवून देत हा मार्ग करण्यासाठी भाग पाडले,कोणा बरोबर किंवा कोनाशिवाय या घोष वाक्यानुसार एकला चला रे चा संयम बाळगत आणि योग्य पाठपुरावा करत आज अकोले तालुक्यासाठी विजयी पताका फडकवत तालुक्यासाठी त्याने एक मोठ्ठी लढाई जिंकलेली आहे, गुगलच्या माध्यमातून १२ वर्षापूर्वी शोध घेऊन,स्वतः दऱ्या खोऱ्यातील हा प्रवास करुन  निर्मनुष्य ठिकाणांहून प्रवास करत पुराव्यांची जोडजमव करत हा निर्जन, निर्मनुष्य मार्ग प्रकाश झोतात आनला आहे,खऱ्या अर्थाने या जोड रस्त्याचे जनक असलेल्या सागर नेहे याने विविध नॅशनल न्यूज टेलिव्हिजन चॅनल वर या कनेक्टिव्हिटी विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.
माध्यमांना घेऊन डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या,याची दखल जवळपास मग हळू हळू सर्वच प्रसार माध्यमांनी घेतली आणि समाजात या कनेक्टिव्हिटी ची स्वप्न पडायला सुरवात झाली. सहज योग, अध्यात्मिक ध्यान, धारणेचा स्वीकार करून इच्छा शक्ती तसेच कार्य शक्ती याचे योग्य संतुलन राखून सकारात्मक उद्देशाने सर्वांना धरून, एकमेकाशी संपर्क करुन देत सर्वांना एकत्र आणून आज या "सागर नेहे कनेक्टिव्हिटीचा सर्वेक्षणाचा शुभारंभ होत आहे.

नगर जिल्ह्यालाच नाही तर खास करुन अकोले तालुक्यातील नागरिकांना या चिरतरुण युवकावर गर्वच नाही तर अभिमान आहे.सागर परशूराम नेहे यांचे आज सर्वच स्थरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे,कोणत्याही पक्षाशी, संघटनेशी किंवा समुदायाची बांधिलकी नसताना फक्त अकोले तालुक्याच्या प्रगतीसाठी, तालुक्यातील समाजाच्या प्रगती साठी झटणाऱ्या या युवकाला अकोलेकरांचा  मानाचा मुजरा, आणि सर्व अकोले तालुक्यातील नागरिकांचे अभिनंदन, या कनेक्टिव्हिटीसाठी त्यास खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
- शेख अल्ताफ इमाम, श्रीरामपूर.
close