shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनोदाचार्य ह भ पं श्री बाळकृष्ण महाराज आहेर यांचे किर्तनाचे आयोजन..!

शिर्डी । प्रतिनिधी :- शिर्डीतील भाविक भक्तांना आनंदाची बातमी "शिर्डी माझे पंढरपुर, साई बाबा रमावर" या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे, मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला किर्तन सोहळा करावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे असा दृष्टांत देखील काही भक्तांना झालाय तो अनुभव भक्तांनी माननीय परम साई भक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजुभाऊ तुळशीराम कोते यांना सांगितला व तो आदेश समजून विजयभाऊ कोते यांनी ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशीला कीर्तनाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

तिसरी सेवा विनोदाचार्य ह भ प श्री बाळकृष्ण महाराज आहेर वैजापूर शनिवार दिनांक 12 l 02 l 2022 रोजी वेळ सायंकाळी 7 ते 9 वाजता होणार आहे.

किर्तनाचे ठिकाण विजू भाऊ कोते यांच्या वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्याचा व किर्तन श्रवनाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा. तिसऱ्या किर्तनाची सेवा गोवर्धन नगर येथील रहिवाशी यांच्यावतीने होईल तरी भाविक भक्तांनी किर्तनाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा.असे संयोजकांनी आवाहन केले आहे.🙏
close