shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'त्या' प्राणीप्रेमींचा शिर्डीकरांनी केला सन्मान..!

शिर्डी ।  प्रतिनिधी:-
शिर्डी नगरपंचायतीच्या सफाई कामगारांनी कर्तव्याबरोबर प्राणी मात्रांवर भूतदया दाखवत मुक्या जनावरांच्या चाऱ्यासाठी केलेल्या प्रयत्नांची साईनगरीत माऊलींच्या विचारांची ज्योत तेजोमय अशा मथळ्याखाली मंगळवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. 

बुधवारी सकाळी वार्ड क्र. ७ मध्ये घरातील केरकचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या नगर पंचायतीच्या त्या दोन प्राणीप्रेमींचा शिर्डीतील साईश्रद्धा हौसिंग सोसायटीचे सचिव रवींद्र मोदी यांनी शाल घालून सत्कार केला. यावेळी पोलिस अंमलदार भागवत बाचकर, श्रीनिवासलू, गणेश पवार, काकासाहेब चव्हाण, तर शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक सचिन चौगुले, शिवसेनेचे सचिन कोते यांनी प्रशासकीय कार्यालयात सत्कार केला. त्यांचे हे कार्य संपूर्ण शिर्डीत होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असून माझी वसुंधरामध्ये या कार्य घेतले जाणार असल्याचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले.
close