shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.प्रियांका पवार हिची शासकीय कोठ्यातुन कॅन्सर तज्ञ अभ्यासक्रम साठी निवड


प्रतिनिधी : किशोर चाकोते

नगर : २१ / नगर तालुक्यातील साकत या छोट्याशा खेड्या गावात प्रियंकाने प्राथमिक शालेय शिक्षण पुर्ण केले.त्यानंतर माध्यमिक शिक्षण जिल्हा मराठा संस्थेचे जनता विद्यालय रुईछत्तीसी येथे पार पाडले. उच्च माध्यमिक शिक्षण ११,१२ वीचे रेसिडिन्सिल हायस्कूल अहमदनगर येथे सायन्स साईटने पार पडले .

 वैद्यकीय शिक्षणाची आवड  असल्याने त्या दिशेने वाटचाल चालू होती. झुंबर पवार जिल्हा लेबर फेडरेशन चालक आहेत. त्यांची कन्या प्रियांका झुंबर पवार  हिने एम.बी.बी .एस चे शिक्षण  वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी घेतले. आता कॅन्सर तज्ञ या विषयी स्पेशल अभ्यासक्रम साठी पोस्ट ग्रॅज्युएशन -रेडिएशन ओन्कलाॅजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी निवड झाली आहे. 

प्रियांकाची एक बहिण बी, एच.एम.एस. तसेच एक भाऊ सध्या एम.बी बी.एस चे शिक्षण घेत आहे. एकाच कुटुंबातील तिघे सख्खे भाऊ बहिण वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत आहे. या निमित्ताने साकत, दहिगाव, वाटेफळ,रुईछत्तीसी  पंचक्रोशीतील नागरिक मान्यवर  कौतुकाचा वर्षाव करत आहे.
close