shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरची कन्या झळकणार चित्रपटात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२       
 
श्रीरामपूरची कन्या झळकणार चित्रपटात…!!

श्रीरामपूर : शहरातील सरस्वती कॉलनी, वार्ड नंबर 7 भागात राहणारे मुळा-प्रवराचे माजी कर्मचारी शिवाजी कोते व मा.शिक्षिका मंगल कोते यांची कन्या प्रतिक्षा कोते ही लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सोयरीक या मराठी चित्रपटात महिला पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
       या चित्रपटाची निर्मिती विजय शिंदे,शशांक शेंडे व मकरंद माने यांनी केलेली आहे.चित्रपटाचे चित्रीकरण अनेक नामंकित कलाकारांसह सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे झाले आहे.

 
     श्रीरामपूरची कन्या प्रतीक्षा हिचे महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण श्रीरामपूर शहरात झालेले आहे.सध्या ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,दिल्ली येथे पुढील शिक्षण घेत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close