shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तान्हे बाळ चोरून नेणाऱ्या महिलेस रेल्वे पोलिसांनी केले अटक.


पुर्णा.. सय्यद कलीम   :  परभणी-जालना येथून एक दिवसाचे तान्हे बाळ चोरून नेणाऱ्या महिलेस रेल्वे पोलीसांनी परभणी येथे अटक केली आहे.

७ जानेवारी रोजी जालना येथून एक संदेश आला की जालना येथील दवाखान्यातून एक दिवसाच्या लेकराला एक महिला रेल्वेने पळाली आहे व ती महिला परभणी येथे उतरली आहे. त्यानुसार परभणी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस.बी.कांबळे यांच्या आदेशानुसार रेल्वे पोलीस विष्णु पांडुळे,एम.एन.वाघमारे यांनी सिसिटिव्ही चेक केले असता ती संशयित महिला रेल्वे स्टेशन परभणी येथे उतरलेली दिसली.सदर माहिती लोकल पोलीस जालना यांना देण्यात आली. तेव्हा जालना पोलीस परभणी येथे येवून रेल्वे कार्यालय परभणी येथे सिसिटिव्ही चेक केले व ती अज्ञात महिला हिच असल्याचे खात्री झाल्यानंतर या महिलेस परभणी येथून अटक करण्यात आली व एक दिवसाचे बाळ हस्तगत केले व त्या महिलेला जालना येथे घेऊन गेले व तीला अटक करून तीच्या विरुद्ध ४४/२०२२ कलम ३६२ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून मुले पळविणा-या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. 


परभणी येथील जमजम कॉलनी येथील महिलाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी माहिती दिली सीसी कॅमेरा महिला बुरखा वर दिसत असताना उघडकीस आली परभणी येथील शासकीय रुग्णालयात महिलांना ताब्यात घेण्यात आले महिलाला जालना येथील पोलिसांनी ताब्यात घेतलीछं
close