shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोडणी च्या तृप्ती डोंबाळे ने केले नेट परीक्षेत यश संपादन. महेंद्रदादा रेडके मित्र मंडळ व तेजपृथ्वी ग्रुप यांच्या वतीने केला सन्मान.

  भोडणी च्या तृप्ती डोंबाळे ने केले नेट परीक्षेत यश संपादन.

  महेंद्रदादा रेडके मित्र मंडळ व  तेजपृथ्वी ग्रुप यांच्या वतीने केला सन्मान.

इंदापूर प्रतिनिधी:भोडणी येथील तृप्ती संतोष डोंबाळे यांनी नेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल महेंद्रदादा रेडके मित्र मंडळ व  तेजपृथ्वी ग्रुप यांच्या वतीने सन्मान सोहळा (दि.८ फेब्रुवारी) रोजी संपन्न झाला.

भोडणी येथील तृप्ती संतोष डोंबाळे या शेतकरी कुटुंबातील  मुलीने दिशा अकॅडमी च्या माध्यमातून नेट परीक्षेत ७२० पैकी ६१० गुण मिळवून  यश संपादन केल्याबद्दल पंचायत समिती येथे  महेंद्रदादा रेडके मित्र मंडळ व तेजपृथ्वी ग्रुप यांच्या माध्यमातून गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते तृप्ती डोंबाळे यांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळेस गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके ,तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात,  दिलीप पाटील, विष्णू पाटील, बापुराव शेंडे, तेजपृथ्वी ग्रुपचे हनुमंत यमगर, गणेश  शिंगाडे, संतोष कुंभार, तृप्ती यांचे वडील संतोष डोंबाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
close