shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर यांच्या वतीनेवसिम आळंदने सनदी लेखापाल (सीए) परिक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल सत्कार .

श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर यांच्या वतीने
वसिम आळंदने  सनदी लेखापाल (सीए) परिक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी:- कळंब (रामवाडी) ता. इंदापूर येथील वसिम महेबूब आळंद याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर सनदी लेखापाल (सीए) परिक्षेमध्ये यश मिळवून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यासमोर आदर्श ठेवला आहे. त्याबद्दल आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर यांच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गेंजगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच्या यशामध्ये वालचंदनगर इंडस्ट्रीज व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गेंजगे यांचे सहकार्य लाभले  असून त्यांनी संधीचे सोने केल्याबद्दल त्याचे विशेष गौरव पूर्वक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी वर्धमान विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार सर, ए. आर .निकम, सोमनाथ अहिवळे सर, वडील मेहमूद आळंद इत्यादी उपस्थित होते.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया तर्फे (ICAI) घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवार (दि. १०) फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये उत्तीर्ण होऊन वसिम आळंद हा सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी पात्र ठरला आहे.

वसिम आळंद यांचे प्राथमिक शिक्षण वालचंदनगर पाठशाळे मध्ये व माध्यमिक शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर तसेच वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण गरवारे महाविद्यालय पुणे येथून झाले. वाचन व लहानपणा पासूनच काही तरी वेगळे करून दाखवण्याचा ध्यास असणारा वसिम सीए परिक्षा उतिर्ण झाला.

वासिमने वाचनावर व प्रक्टिकल, अकाऊंटवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत दररोज बारा-पंधरा तास अभ्यास करून प्रतिकूल परिस्थितीवर इच्छा शक्तीने मात केली. आई, वडिल, भाऊ, बहिणी, मार्गदर्शक शिक्षकांचा व मित्रांचा सीए बनण्यामागे मोलाचा वाटा असल्याचे वसिमने सांगितले.

बालपणापासून बुद्धीमत्तेची चुणूक दाखवणाऱ्या वसिमने २०१३ मध्ये सीपीटी, २०१७ मध्ये आयपीसीसी परिक्षा उत्तीर्ण होऊन सन मे २०२१ मध्ये मध्ये सीए फायनलचा पहिला ग्रुप पास होऊन डिसेंबर २०२१ मध्ये दूसरा ग्रुप पास होऊन अखेर आई-वडील, भाऊ, बहिणींचे स्वप्न सत्यात उतरवण्यात तो यशस्वी झाला.

वसिमने अत्यंत खडतर प्रवासातून मिळवलेल्या यशाचे कौतुक असून त्याच्या यशाचा अभिमान आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी विविध स्पर्धा परिक्षांमधून यश मिळून गावाचे, देशाचे नाव उज्वल वाशिमच्या यशाने नव्यापिढीला समोर एक आदर्श निर्माण झाला आहे - मेहबूब आळंद (वडील) 

शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण असून, तरुणांनी आपल्या करिअरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीए परिक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी व करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन होण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार - वसिम आळंद- (चार्टर्ड अकाऊटंट)

आईच्या आठवणीने वसिमला अश्रू अनावर... 

आज वसिमचा वाढदिवस व सीए परिक्षेचा निकाल असा दुग्धशर्करा योग असून देखिल आईच्या आठवणीने वासिमच्या डोळ्यात अश्रु अवतरले. आई आपल्या बरोबर नसल्याची खंत वसिमने बोलून दाखविली. वसिमच्या आईचे २०१८ मध्ये दुःखद निधन झाले आहे. आपले हे यश आईला समर्पित केल्याची भावना वसिमने बोलून दाखवली. वडिलांचा पाठिंबा व आईच्या आशिर्वादने हे यश मिळाल्याची भावना वसिमने बोलून दाखविली.
close