shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरीय नियोजन समिती वरती महेंद्र रेडके यांची नियुक्ती.

तालुकास्तरीय नियोजन समिती वरती महेंद्र रेडके यांची नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी:पंचायती राज मंत्रालयाने सन २०१८ पासून सर्वंकष असे ग्रामपंचायत विकास आराखडे (जीपीडीपी) तयार करण्यासाठी 'सर्वांची योजना, सर्वांचा विकास' या नावाने भारत सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने एकत्रितरीत्या मोहीम जाहीर केली. अशा प्रकारच्या मोहिमेमुळे ग्राम विकास आराखड्याची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार भारत सरकारने १५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना देण्याचे निश्चित केले. 
यामध्ये शासन निर्णयानुसार १५ व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी ६० टक्के बंधीत निधी व ४० टक्के अबंधीत निधी या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले.
 जिल्हा परिषदा व पंचायत समिती यांच्या विकास आराखड्यासाठी समन्वयक म्हणून प्रत्येक तालुकास्तरावर नियोजन समितीची स्थापना करण्यात यावी असे निर्देश शासनाने दिले. हि नियोजन समिती जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा म्हणून काम करेल. पंचायत समितीचे सभापती हे नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. तसेच पंचायत समिती मधील सर्व खातेप्रमुख हे नियोजन समितीचे सदस्य असतील. इंदापूर तालुक्यातून स्वच्छता व पर्यावरण तज्ञ म्हणून महेंद्र रेडके हे सदस्य म्हणून काम पाहतील.

नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्य महेंद्र रेडके यावेळी बोलताना म्हणाले की मंजूर विकास आराखड्यातील कामे,प्रकल्प व योजना यांची वेळेत व प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, पूर्ण झालेली कामे, प्रकल्प व योजना या संदर्भातील माहिती ई-ग्रामस्वराज्य पोर्टल वर अपलोड करणे,  सर्व पूर्ण कामांची देयके पी एफ एम एस प्रणालीद्वारे अदा करणे, स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील या गोष्टीचा विचार करणे, कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची दक्षता नियोजन समिती घेणार आहे. 

यावेळी पुढे बोलताना रेडके म्हणाले की पंचायत समिती नियोजन समिती अंतर्गत संसाधन विकास व जलसंसाधने, महिला व बाल विकास, सामाजिक सुरक्षा व सामाजिक न्याय, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व हवामान बदल इत्यादी क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.

तालुका स्तरीय पंचायत समिती नियोजन समितीची मासिक बैठक कर्मयोगी शंकररावजी पाटील सभागृहांमध्ये पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, महेंद्र रेडके,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, सर्व खाते प्रमुख व इतर सदस्य उपस्थित होते.
close