shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रवरा नदीपात्रात राहुरीच्या तहसिलदारांनी तस्कराचा ढंपर,यारीसह ट्रॅक्टर पकडला..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२


प्रवरा नदीपात्रात राहुरीच्या तहसिलदारांनी तस्कराचा ढंपर,यारीसह ट्रॅक्टर पकडला..!!


राहुरी : तालुक्यातील सात्रळ व चांदेगाव प्रवरा नदीपात्रात तहसीलदार फसियोद्दीय शेख यांच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टॅंकर,टॅम्पोसह साहित्य जप्त करत धडक कारवाई केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
          शनिवारी राञीच्या दरम्यान तहसीलदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू विरोधी पथक गस्त घालत असताना साञळ व चांदेगाव येथील प्रवरा नदीपात्रात वाळूने भरलेला एक टेम्पो, ट्रॅक्टर आणि वाळु काढायचे साहित्य आढळून आले. सदर चालकास परवाना विचाराला असता तो आढळून आला नसल्याने सदर पथकाने या अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन करणारे ट्रॅक्टर यारीसह व टेम्पो जप्त केला आहे.
 
       तहसीलदार शेख यांचे मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी दत्तात्रय गोसावी, तलाठी अभिजीत क्षीरसागर, सुनिल गिते, राजेंद्र वराळे, महेश देशमुख, अनिल धुमाळ यांचे पथकाने कारवाई केली.


✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close