shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बायोडायव्हर्सिटी पार्क येथे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गतवर्षी १९ फेब्रुवारी शिवजयंती चा मुहूर्त साधून जांभळीच्या लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा.

बायोडायव्हर्सिटी पार्क येथे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गतवर्षी १९ फेब्रुवारी शिवजयंती चा मुहूर्त साधून जांभळीच्या लावलेल्या झाडाचा  वाढदिवस  साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गतवर्षी १९ फेब्रुवारी शिवजयंती चा मुहूर्त साधून इंदापूर शहरातील बायोडायव्हर्सिटी पार्क येथे जांभळाची झाडं लावण्यात आलेली होती. त्या सर्व जांभळीच्या झाडाचे संगोपन इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी यांनी करत एकही झाड न जळून देता त्याची देखभाल केली. 
आज इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नरपालिका कर्मचार्‍यांचे सत्कार करण्यात आला तसेच झाडाचा ही वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता शहा उपस्थित होत्या. यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की लवकरच ह्या जांभळीच्या झाडाचे जांभळाचे फळ इंदापूर शहरातील नागरिकांना खाण्यास मिळो.                                     
यावेळी मुकुंद  शहा, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्यअध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस जाकिर काजी, शहर अध्यक्ष चमन बागवान, उपाध्यक्ष तुषार चिंचकर, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, निवास शेळके, महादेव लोंढे, भगवान पासगे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
close