*जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी श्री वर्धमान विद्यालयास दिली भेट.
विद्यार्थ्यांसाठी पाच लाख रुपये ची ओपन जिम तसेच मैदान दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी तात्काळ सात लाख रुपये केले प्रस्तावित .
इंदापूर प्रतिनिधी:क्रीडा जिल्हाधिकारी महादेव कसगावडे सर व तालुका क्रीडा अधिकारी महादेव चावले यांनी श्री वर्धमान विद्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यालयातील विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. विद्यालयातील क्रीडा साहित्य व मैदानाची पाहणी केली व विद्यालयातील गुणवंत खेळाडूंची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होऊन जास्तीत जास्त खेळाडू तयार होण्यासाठी मैदान व्यवस्थित असावे लागते. यासाठी मैदान दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी तात्काळ सात लाख रुपये प्रस्तावित केले. तसेच भविष्यात विविध योजनेच्या माध्यमातून भरघोस मदत करू असे आश्वासन देखील दिले. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तालुक्याचे क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी पाच लाख रुपये ची ओपन जिम मंजूर करण्याचे प्रस्तावित यावेळी केले.
यावेळी प्राचार्य कुंभार सर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे व तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांचे यथोचित सत्कार केला व आभार मानले.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पडारी सर पर्यवेक्षक हिरवे सर व पिसे सर, ज्येष्ठ शिक्षक तावरे सर, पंकज पाटील सर, क्रीडा शिक्षक देठे सर उपस्थित होते.

