shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेळाडूंनी देशपातळीवर नावलौकिक मिळविण्यासाठी श्रीरामपूर कबड्डी लीगची स्थापना- प्रा.सुनील गाडेकर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२   

 खेळाडूंनी देशपातळीवर नावलौकिक मिळविण्यासाठी श्रीरामपूर कबड्डी लीगची स्थापना- प्रा.सुनील गाडेकर..!!

ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ७ फेब्रु.रोजी आ.कानडे यांच्या हस्ते खेळाडूंची निवड चाचणी शुभारंभ...

श्रीरामपूर : कबड्डी खेळाडूंनी कबड्डी स्पर्धेत भाग घेऊन आपले देशपातळीवर नावलौकिक करावे व शासनाच्या असलेल्या लाभाचा नोकरीसाठी, विविध कंपन्यामध्ये जॉब घेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर तालुका कबड्डी लीगच्या स्थापना शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष प्रा.सुनील गाडेकर यांनी इच्छामणी कार्यालयात झालेल्या कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन केले.
कबड्डी खेळाडूंची फक्त निवड चाचणी शुभारंभ ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीयम क्रीडा मंडळ उंदीरगाव येथे आ.लहू कानडे यांच्या हस्ते दि ७ फेब्रु.रोजी सकाळी ९ वाजता कोरोनाचे नियम पाळून होणार असल्याचे गाडेकर यांनी सांगितले. रवी गाढे, रियाज शेख, प्रकाश बांद्रे, अतुल धीवर, अजित गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही संघटना स्थापन झाली व नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. 

त्यात श्रीरामपूर कबड्डी लीगच्या अध्यक्षपदी स्वराज अकॅडेमीचे प्रा. सुनील गाडेकर यांची सर्वानुमते निवड झाली. कार्याध्यक्ष अनिल पटारे [टाकळीभान], उपाध्यक्ष- लक्ष्मण सुडके [जगदंबा-भोकर] व देविदास जगताप [ जयहिंद श्रीरामपूर], सचिव- सचिन गायकवाड [स्वराज अकॅडेमी ], सहसचिव- राहुल कोकणे [ओन्ली साई.टाकळीभान] धनंजय आसने [भारतीयम.उंदीरगाव], मार्गदर्शक-भास्कर ताके, अशोक फुलारे, हौशीराम गोर्डे, शाम गाडेकर, किरण धुमाळ, शहाराम डिके, बाबासाहेब घोडे, प्रशांत पंडित, बालाजी पटारे, प्रकाश गाडेकर, बाळासाहेब वायकर, अमोल गायकवाड, भुजबळ, बंटी मिरीकर अशी निवड झाली. श्रीरामपूर तालुक्यात खेळाडूंसाठी संघटना स्थापन झाली. निवड चाचणीनंतर कबड्डी स्पर्धा घेण्यात येतील.   
 
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close