सामाजिक कार्याची दखल घेत अनिल पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदेश युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा दिनी पुरस्कार प्रदान
प्रा, जोगेंद्र कवाडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अनेक मान्यवरांची उपस्थिती
फोटो :सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करतानां
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे,महाराष्ट्र प्रदेश युवकाध्यक्ष संजय सोनवणे व इतर
इंदापूर प्रतिनीधी:सामाजिक कार्याची दखल घेत इंदापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आपले मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल आण्णा पवार यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन दिनी(१४) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषन पुरस्कार प्रदान करण्यात आला.इंदापूर तालुका ,बारामती तालुका, माळशिरस, माढा, करमाळा , सोलापूर पुणे अशा विविध तालुका जिल्ह्यातून अभिष्टचिंतन दिन सोहळ्या निमित्त अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी महिलांनी उपस्थिती लावली होती.अनिल आण्णा पवार सामाजिक कार्य करत असताना राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा,नाट्य, शैक्षणिक क्षेत्रातील विविध अडचणी असणाऱ्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना, सामान्य जनतेला ,वंचित, दिन , दलितांना सतत अडीअडचणी व मदतीला धावून जात असता.
अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. युवकांचे अभिष्टचिंतन, विद्यार्थ्यांना मदत, कोरोना काळात अनेक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, इंदापूर तालुक्यात रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवत असतात. प्रत्येकाच्या सुखा-दु:खात धावून जाणारा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून इंदापूर तालुक्यातील जनतेने आण्णा ही उपाधी दिलेली आहे, असे हे व्यक्तिमत्व असणारे अनिल आण्णा पवार हे आपल्या मेंबर परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल आण्णा पवार म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून इंदापूर तालुक्यातील प्रत्येक माता-भगिनी , जनतेचा असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आताच्या युवा पिढीने आत्मसात करावे. त्यावर चिंतन, मनन करावे. त्यांचा अभ्यास करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना ही एक पुस्तक नसून, मानवी जीवन जगण्यासाठी अतिशय मार्गदर्शक तत्त्व आहेत. आज मला पुरस्काराने सन्मानित केले आहे, ही कौतुकाची थाप येणाऱ्या प्रत्येक काळात मला अनेक जोमाने काम करण्याची ताकद देणार आहे असे ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये पत्रकार राहुल ढवळे, सुधाकर बोराटे ,सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे,महाराष्ट्र प्रदेश युवकाध्यक्ष संजय सोनवणे, जिल्हा युवक अध्यक्ष सिद्धार्थ घोडेराम, सोमनाथ घोडेराम,अल्पसंख्यांक आघाडीचे अब्बास शेख,युवा नेते कपिल लिंगायत,आंनद कडवे, इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे प्रमुख हामा पाटील, महेंद्र रेडके, युवा अमोलराजे इंगळे , विविध मान्यवर उपस्थित होते
--------

