shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आज इंदापुर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.

 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आज इंदापुर येथे  कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. 


आगामी निवडणूक, पक्ष बळकटीकरण, इंदापूर तालुक्यातील पाणीप्रश्न यावरती नक्की काय बोलणार ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री.


राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी प्रदेश महिला  अध्यक्षा रूपालीताई चाकणकर महिला सक्षमीकरण बद्दल काय भूमिका मांडणार?

इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधून विचार विनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे मार्गदर्शनाखाली,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली राज्यात “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा” सुरु करण्यात आली आहे. सोमवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे,महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत यास प्रारंभ करण्यात आला.आज (दि.२३ फेब्रुवारी २०२२)रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे  इंदापूर दौऱ्यावर येणार असून सायंकाळी ६ वाजता इंदापूर मधील शहा सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

यावेळी संवाद यात्रेत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ रूपाली चाकणकर,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मेहबूब शेख,कार्याध्यक्ष रविकांत वरपे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.सक्षणा सलगर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आदी प्रमुख मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

या संवाद यात्रेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांसह इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक, विविध सेल चे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष बळकटीकरण इत्यादी अनेक विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील आज इंदापूर मध्ये काय बोलतील तसेच इंदापूर तालुक्यातील पाणी   प्रश्‍नाच्या विषयावरती कार्यकर्त्यांना काय संबोधित करतील यावर कार्यकर्त्यांसह इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष राहणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर या निवड झाल्यानंतर प्रथमच इंदापूर मध्ये येत आहेत. महिला सक्षमीकरण, पक्षातील महिलांचा सहभाग या संदर्भात ते काय बोलतील याकडे महिला वर्गाचे लक्ष राहणार असल्याचे दिसून येते आहे.
close