कारवाई न झाल्यास मुनीश्री उपवास करणार
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नवागड : दि . २३ / मुनिश्री प्रबलसागरजी महाराज यांच्या सानिध्यात दि . २२ फेबुवारी रोजी नवागड प्रकरण संपुष्टात येणार असल्याचे ठरावपत्र करण्यात आले आहे .
दि . २२ फेब्रुवारी पासुन ३ दिवसात मुनिश्रींच्या सानिध्यात तिर्थ रक्षाकमेटी मेंबरच्या समोर संबंधीत सर्व ट्रस्टी बसुन कोर्टात सुरु असलेला वाद समाप्त करणार असल्याचे आज मुनिश्रींसमोर पत्राद्वारे लिखीत सादर करण्यात आले.
आज मुनिश्री प्रबलसागरजी महाराजजी यांच्या समोर ट्रस्टी सुनिल पन्नालाल गोधा (अध्यक्ष यांचे पुत्र) ,कमलाकर संघई-महामंत्री ,राजेंद्र पाटणी ,सुभाष अंबुरे ,पवण झांजरी ,मुकेश बडजाते आदि ६ ट्रस्टींच्या समझोता पत्रावर सह्या करण्यात आल्या आहेत.
अशी घोषणा नवागड येथे जमलेल्या समाज बांधवांसमोर करण्यात आली.
तीन दिवसानंतर जर लिहुन दिले प्रमाणे कारवाई झाली नाही तर परत मुनिश्री उपवास करण्यासाठी बसणार असल्याची माहिती पवन अंबुरे यांनी दिली आहे .

