इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी हे गाव पूर्वी कनकगिरी या नावाने प्रसिद्ध होते. परंतु श्रीनाथ पंथातील सिद्धपुरुष मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य गोरखनाथ फिरत फिरत या कनकनगरीत आले. ते दिवस होते भाद्रपद वद्य पक्षातील एकेदिवशी श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्ष यांना भिक्षा मागून आणण्यास सांगितले. गोरक्षनाथांनी गावातील एका ब्राह्मणाच्या घरी अलक!. म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून वडे पुरी भाजी सर्व पदार्थ वाढून आले. ते ताट घेऊन गोरक्ष गुरु जवळ गेले. मच्छिंद्रनाथांनी जेवण केले. पण त्यातील वडे त्यांना फार आवडले. त्यांनी पुन्हा वडे आन म्हणून सांगितल्यावर परत गोरक्ष नाथ त्यास घरी गेले व अलक ! म्हणून भिक्षा मागितली. तेव्हा ती बाई म्हणाली पुन्हा आलास तेव्हा गोरक्ष म्हणाले माझ्या गुरूंना वडे फार आवडले आहेत. तरी अजून वडे द्या तेव्हा त्या बाई म्हणाल्या तू खोटे बोलत आहेस. खरच तुझ्या गुरूंना वडे हवी असतील तर तुझा डोळा काढून दे. गोरक्षकांनी विचार न करता डोळा काढून दिला व गुरूंची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून या गावाला वडापुरी असे नाव पडले. अशी आख्यायिका आहे.या पुण्यभूमीत श्री नाथांची व श्री माणकोजी महाराज मुळे यांची संजीवन समाधी आहे. अशा पुण्यनगरीमध्ये वडापुरी गावचे ग्रामदैवत श्री नाथ महाराजांच्या जागर सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन सोहळा सालाबादाप्रमाणे साजरा होत आहे.
त्यास आज दि २३ फेब्रुवारी २०२२ रोजी समस्त ग्रामस्थ वडापुरी यांच्या वतीने प्रारंभ करण्यात आला.
अखंड हरिनाम सप्ताहतील दैनंदिन कार्यक्रम: काकडा भजन पहाटे ४ ते ६ ज्ञानेश्वरी ,पारायण सकाळी ८ ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १, हरिपाठ सायंकाळी ५ ते ६ प्रवचन ,व्याख्यान सायंकाळी ६ ते ७, किर्तन सायंकाळी ९ ते ११ व नंतर हरिजागर असे कार्यक्रम होणार असून
या सोहळ्यातील प्रवचन सेवा बुधवार दिन २३ रोजी घनश्याम देवकर वडापुरी, कीर्तन सेवा चैतन्य देवकर पंढरपूर, गुरुवार दि. २४ रोजी प्रवचन सेवा अनिल नादे, कीर्तन सेवा विशाल वाघमारे इंदापूर, शुक्रवार दि. २५ रोजी प्रवचन सेवा श्रीमंत जाधव ,कीर्तन सेवा अनिरुद्ध निंबाळकर बिटरगाव, शनिवार दि. २६ रोजी प्रवचन सेवा उमराव देवकर ,कीर्तन सेवा शंकर मराठे देहू, रविवार दि. २७ रोजी प्रवचन सेवा मुरलीधर चौरे अकोले, कीर्तन सेवा विठ्ठल चवरे पंढरपूर, सोमवार दि. २८ रोजी प्रवचन सेवा विठ्ठलदास महाराज,कीर्तन सेवा माऊली आनंदनगर पंढरपूर ,मंगळवार दि. १ मार्च रोजी प्रवचन सेवा डॉक्टर लक्ष्मण आसबे बावडा, कीर्तन सेवा नामदास महाराज नामदेव महाराजांचे वंशज, तर बुधवार दि. २ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन प्रभाकर बोधले, संत माणकोजी महाराज यांचे अकरावे वंशज यांचे होणार आहे.
या सोहळ्यातील अन्नदाते वडापुरी गावातील ग्रामस्थ असून अल्पोपहार ८:३० ते ९, दुपारचे अन्नदाते १२:३० ते २ आणि सायंकाळच्या अन्नदाते ७:३० ते ९ या वेळेत अन्नदान करणार आहेत.
तसेच काल्याचे महाप्रसाद सुभाष कृष्णराव नलवडे वडापुरी यांच्या वतीने होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहतील व्यासपीठ चालक म्हणून घनश्याम देवकर व बाळासो बोधले संत माणकोजी महाराज यांचे अकरावे वंशज हे करीत आहेत.
ग्रामदैवत श्री नाथ जागर निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व गाथा भजन सोहळा श्री नाथ मंदिर वडापूरी तालुका इंदापूर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ वडापुरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून याचा प्रारंभ आज दि २३ गुरुवारी रोजी सकाळी श्री नाथ महाराज यांना अभिषेक घालून व कलश पूजन आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ गाथा ग्रंथ टाळ मृदुंग यास ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने यथोचित पूजा करून पंचपदी चे भजन करून ज्ञानेश्वरी पारायण सोहळास सुरुवात करण्यात आली.
यावेळी गावातील लहान थोर ज्येष्ठ व ग्रामस्थ उपस्थित होते.

