इंदापूर तालुक्यासाठी क्रीडा विभागातून ४ कोटी ४६ लक्ष ८० हजार मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
तालुक्यातील पाच गुणवान खेळाडूंना क्रीडा साहित्या करिता आमदार निधीतून रू. प्रत्येकी ५ लक्ष.
इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ या वर्षात क्रीडा विभागास प्राप्त होणाऱ्या निधीतून इंदापूर तालुक्यास भरघोस असा निधी प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यासाठी क्रीडा विभागातून ४ कोटी ४६ लक्ष ८० हजार मंजूर करण्यात आले आहेत.शिवाय तालुक्यातील पाच गुणवान खेळाडूंना क्रीडा साहित्या करिता आमदार निधीतून रू. प्रत्येकी ५ लक्ष मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
दत्तात्रय भरणे म्हणाले कि, पुणे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायत चाकाटी व शहा यांना प्रत्येकी कुस्ती मॅट करिता ८ लक्ष ९० हजार ग्रामपंचायत पळसदेव व एन.यी. एस. हायस्कूल निमसाखर यांना कबठ्ठी मॅट करिता प्रत्येकी ८ लक्ष रुपये या प्रमाणे एकूण चार संस्था, शाळांना कुस्ती व कबड्डी मॅट करिता ३३ लक्ष ८० हजार मंजूर करण्यात आले.
क्रीडा साहित्य योजना अंतर्गत क्रीडा साहित्या करिता विश्वासराव रणसिंग महाविद्यलय कळंब (३ लक्ष रुपये), छत्रपती हायस्कूल अंथुर्ण, काळभैरवनाथ विद्यालय कळाशी, बोरी ह्यास्कुल बोरी या सर्वाना (३ लक्ष रुपये), तर जिल्हा परिषद शाळा सणसर, जिल्हा परिषद शाळा बोरी, जिल्हा परिषद शाळा घोरपडवाडी, जिल्हा परिषद शाळा पिंपरी खुर्द, जिल्हा परिषद शाळा सपकाळवाडी, जिल्हा परिषद शाळा कौठळी, जिल्हा परिषद शाळा कुरवली, जिल्हा परिषद शाळा कळंब, जिल्हा परिषद शाळा खामगळवाडी, जिल्हा परिषद शाळा उघडा रुती, कडबन वाडी, जिल्हा परिषद शाळा तनपुरेवाडी, जिल्हा परिषद शाळा बलपुडी, जिल्हा परिषद शाळा म्हस्केमळा, जिल्हा परिषद शाळा कळस, यांना प्रत्येकी २.५ लक्ष रुपये तसेच अनुसूचित जाती • उपाय योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळा डाळज, जिल्हा परिषद शाळा आगोती नंबर १, जिल्हा परिषद शाळा सरडेवाडी, जिल्हा परिषद शाळा लालापुरी कळंब, जिल्हा परिषद शाळा सरस्वती नगर, अनंतराव पवार प्राथमिक शाळा नीरनिमगाव, जिल्हा परिषद शाळा शिरसोडी, जिल्हा परिषद शाळा, शेटेवस्ती, गोतोंडी, जिल्हा परिषद शाळा, कानोबामळा, निबगाव केतकी, जिल्हा परिषद शाळा बेलवाडी, जिल्हा परिषद शाळा तक्रारवाडी, जिल्हा परिषद शाळा भिगवण, जिल्हा परिषद शाळा निरगुडे, जिल्हा परिषद शाळा तरंगवाडी, श्री. वर्धमान विद्यालय व ज्यु. कॉलेज वालचंदनगर, सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर, लोकनेते महादेव राव बोडके दादा विद्यालय पिंपरी बु. असा एकूण ९४ लक्ष रुपयेचा निधी क्रीडा साहित्याकरिता मंजूर करण्यात आला.
व्यायाम साहित्याकरिता ५ लक्ष या प्रमाणे सर्व साधारण योजने अंतर्गत तालुका क्रीडा संकुल इंदापूर, ग्रामपंचायत बोरी, ग्रामपंचायत रणगाव (रत्नपुरी), ग्रामपंचायत बेलवाडी, ग्रामपंचायत वालचंदनगर, ग्रामपंचायत बाभूळगाव ग्रामपंचायत जाचकवस्ती, ग्रामपंचायत काँठळी, ग्रामपंचायत गोतोंडी, पंचायत समिती इंदापूर, विश्वास राव रणसिंग विद्यालय कळंब, इंदापूर नगरपरिषद ग्रामपंचायत निरवांगी, रासकर वस्ती ग्रामपंचायत चाकाटी ग्रामपंचायत कांदलगाव ग्रामपंचायत शेटफळ हवेली, ग्रामपंचायत कडबनवाडी ग्रामपंचायत घोरपडवाडी ग्रामपंचायत कालठाण नंबर २ ग्रामपंचायत सपकळवाडी, ग्रामपंचायत आजोती सुगाव, ग्रामपंचायत सरडेवाडी, ग्रामपंचायत भांडगाव, ग्रामपंचायत कळस असा एकूण १ कोटी २५ लक्ष निधी मंजूर केला आहे.
जिम्नॅस्टिक्स मॅट करिता तालुका क्रीडा संकुल इंदापूर व अंथुर्ण येथे रु. ८ लाख या प्रमाने १६ लक्ष मंजूर करण्यात आले आहे. अंथुर्ण येथील क्रीडा संकुल बांधकामास रु. १ कोटी ७५ लक्ष लॉन टेनिस, बास्केट बॉल व इतर सुविधा करिता हा निधी मंजूर केल्याची माहिती भरणे यांनी दिली.

