पुर्णा(प्रतिनिधी ):- सासरच्या मंडळीच्या सततच्या जाचास कंटाळून विवाहीतेने पुर्णा पोलीसाकडे धाव घेऊन चार जणाविरुध्द पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी महिला मिथीला अमीत वाघमारे रा.आनंद नगर पुर्णा याचा शुभविवाह अमित सतेजचंर्द वाघमारे रा.पेशवे नगर बँक काॕलनी सातारा परिसर औरंगाबाद यांच्या सोबत झाला होता. विवाहानंतर तुझ्या माहेराहुन धंघासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला तगादा लावला.शिवाय शारिरिक व मानसिक छळ करुन उपाशी पोटी ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. नणंद ही भाऊ व आई वडिलाना लाऊन देत असल्याचा आरोपही फिर्यादीत नमुद केले आहे.
प्रारंभी फिर्यादीने परभणीच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्याल्यात भरोसा सेलकडे धाव घेतली तेव्हा भरोसा सेल मध्ये तडजोड झाली नसल्याने पुर्णा पोलीसानी आरोपी पतीअमित सतेजचंर्द वाघमारे सतेजचंर्द सिध्दलिंग आप्पा वाघमारे सासरे. प्रभावती सतेज चंद्र वाघमारे सासु. स्मिता सुहास धवले नणंद रा.टिळक नगर गांधी चौक लातुर या चौघाविरुध्द गुरन.33/2022कलम 498अ 323.506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुभाष चंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नितिन वडकर हे करीत आहेत.आरोपीना आघाप पोलीसानी आटक केली नाही.

