खड्ड्यात लावणार झाडे -संजय घोलप
प्रतिनिधी : सुर्यकांत होनप
करमाळा : ६ / करमाळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने शहरातून जाणारा दत्त मंदिर ते कोर्ट, विश्रामगृह रस्त्यावर वृक्षारोपण करणार असल्याची बातमी देऊन पण सोलापूर जि.प.अध्यक्ष यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. जि.प. अध्यक्ष हे करमाळा तालुक्यातील असुन, त्यांनी तातडीने दखल घ्यायला हवी होती. कारण ते व सर्व आधिकारी व सर्व पक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांसह, पुढारी याच रस्त्याने दिवसातुन कित्येक वेळा ये जा करतात. हा रस्ता शासकीय ऑफिस, कोर्ट, ycm काॅलेज, विश्रामगृह, व सर्व साखर कारखान्याकडुन होणारी उस वाहतुक आणि जड वाहने या रस्त्यावरून ये जा होत असते. परंतु रस्त्याची अवस्था, अशी झाली आहे कि, या ठिकाणाहुन रस्ता होता कि नव्हता अशी झाली आहे.
व तेथील ycm काॅलेजचे विद्यार्थी या रस्त्याच्या धुळीमुळे आजारी पडत असुन, त्याचप्रमाणे रस्त्यावर एवढे खड्डे झाले असुन, कोणती गाडी कधी पलटी होईल सांगता येत नाही. त्यामुळेच येथील नागरिक पण आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत ,तरी पण जि.प. बांधकाम विभाग करमाळा ,यांना निवेदन देऊन हि कसलीच दुरूस्ती होत नाही. मग आता काय नागरिकांचा ,किवा विद्यार्थ्यांचा जीव जाण्याची प्रशासनाकडून वाट बघितली जातेय का? त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दत्त मंदिर ते विश्रामगृह रस्त्यावर दहा दिवसांत खड्डे बुजवुन दुरूस्ती न झाल्यास, रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करणार असुन, रस्ता तत्काळ दुरूस्त करावा. व प्रशासनाने लवकर दखल घ्यावी. असा इशारा मनसे करमाळा ता. अध्यक्ष संजय घोलप यांनी इशारा दिला आहे.

