राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कडून तोरणे कुटूंबीयांचे सांत्वन.
इंदापूर प्रतिनिधी:(दि.५ फेब्रुवारी २०२२)बावडा येथील जेष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज(दि.५) तोरणे कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
बुध्दवासी तोरणे हे जुन्या पिढीतील एक हाडाचे पत्रकार तसेच सामाजिक चळवळीतील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते . त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण करून सामाजिक प्रश्नांवर नेहमीच प्रकाशझोत टाकला होता,त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये ते नेहमीच अग्रभागी होते.त्यांच्या जाण्याने ख-या अर्थाने आपण एका जेष्ठ मार्गदर्शकाला मुकलो असल्याच्या भावना श्री.भरणे यांनी तोरणे कुटूंबीयांचे सांत्वन करते वेळी व्यक्त केल्या.
यावेळी जि.प.सदस्य प्रताप पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,मा.पंचायत समितीचे सभापती प्रशांत पाटील,विजय घोगरे,उमेश घोगरे,सुरेश शिंदे सर,विद्यासागर घोगरे,तुकाराम घोगरे, ज्ञानदेव बागल गुरजी,दत्तात्रय घोगरे,जालिंदर गायकवाड,नागेश गायकवाड,नंदकुमार गायकवाड,पांडुरंग कांबळे, सतिश कांबळे, प्रसाद ढवळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

