shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णेत दोन गटात तूंबळ हाणामारी, पोलिसांनी केले दुकाने बंद! पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने गुन्हेगारी वाढली

पूर्णा-शहरात शनिवार रोजी रात्री ८ वाजता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात आगामी नगरपालिका निवडणुक कारणावरून एकमेकांशी शिवीगाळ होवून त्याचे रूपांतर तूंबळ हाणामारीत झाले. त्यामुळे शहरातील दुकाने भीतीच्या वातावरणाने बंद झाले. खुद्द पोलीसांनी दुकाने बंद करा म्हणून लाठीचार्ज केला? त्यानंतर या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. हाणामारी नंतर दोन्ही गटातील लोक पोलीस ठाण्यात गेले. परंतु पोलीसांनी मात्र राजकीय दबावाखाली येवून पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केलाच नाही. 

गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. तसेच चाकूने भोसकने, छेडछाड प्रकरण, अवैध रेती उपसा, मटका, गुटखा ही अवैध धंदे फोफावली आहे. ठाण्यात गुन्हे दाखल होत नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे. कालपरवा तुंबळ हाणामारी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी मागील निवडणुकीत मस्तानपुरा, गवळी गल्ली येथून निवडणूक लढवून निवडुन आले होते. आता निवडणूक होवू घातली असताना  कोणते तरी कारणे पुढे करून वादविवाद होत आहेत. निवडणूक काळात काय होईल? याचे सांगणे कठीण आहे.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री यांच्या जिवावर जनतेला वेठीस धरुन वादविवाद केले जात आहेत. 

कामाचे श्रेय स्वतालाच मिळण्यासाठी आटापिटा केला जात असताना या कारणावरुन भांडणतंटे होवू लागले आहेत. एकाच पक्षातील दोघेही कार्यकर्ते असूनही झगडे होत असल्यामुळे जनतेनी याचा काय बोध घ्यावा? असा प्रश्न पडत आहे. आगामी निवडणुकीत मीच अमूक तमूक वार्डातून निवडून यावे, यासाठी नाना प्रयत्न केले जात आहेत. एकमेकावर पैशाची घमेंड दाखवली जात आहे. अशा कारणाने भांडणतंटे वाढत आहेत. वादा नंतर पोलीस निरीक्षक मात्र गुन्हा का दाखल करत नाही, गरीबांची भांडणतंटे झाल्यावर ताबडतोब गुन्हे दाखल होवून अटक केली जाते. परंतु मोठ्या पैशेवाल्यांची भांडणतंटे झाल्यावर गुन्हा दाखल करीत नाहीत. याकडे परभणी जिल्ह्यातचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जयन मीना यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, पोलीस अधीक्षक यांनी ठेवलेले गोपनिय पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक यांना माहिती का देत नाहीत? ते शुध्दा पोलीस निरीक्षक यांचे ऐकून माहीती देत नाही. हे कर्मचारी पोलीस निरीक्षक व राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करतात का? असा सवाल जनता करीत आहे.
close