shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री क्षेत्र नारायणडोहो येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा

 प्रतिनिधी : निरज चांगटे

नारायणडोहो : २२ /  श्री क्षेत्र नारायणडोहो  तालुका नगर येथे योगीराज श्री चांगदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त व महाशिवरात्रीच्या महापर्व कालावधी  मध्ये कै. ह. प. बाळकृष्ण महाराज भोंदे ह भ प जंगले महाराज शास्त्री ह भ प भास्करगिरी महाराज व ह भ प विकासानंद महाराज मिसाळ यांच्या कुशल  मार्गदर्शनाने बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २२ ते २ मार्च २२ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा तसेच विठ्ठल नाम जप यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती सांप्रदायिक युवक भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ नारायण डोहो  यांनी दिली आहे .

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे- 
 बुधवार दि.२३/०२/२०२२
ह.भ.प.पारस महाराज
मुथ्था 
(गायनाचार्य)
जागर-उक्कडगाव भजनी मंडळ,
गुरुवार दि.२४/०२/२०२२
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज
तांबे 
(रामायणाचार्य)
जागर-मांडवा भजनी मंडळ,
शुक्रवार  दि.२५/०२/२०२२
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे
(आळंदी)
जागर-सारोळा बद्दी भजनी मंडळ,
शनिवार दि.२६/०२/२०२२
ह.भ.प.प्रा. निलेश महाराज
कोरडे (प्रबोधनकार)
(भागवताचार्य)
जागर-दरेवाडी भजनी मंडळ,
रविवार दि.२७/०२/२०२२
ह.भ.प.अक्रुर महाराज
साखरे
(भागवताचार्य)
जागर-निंबोडी भजनी मंडळ,
सोमवार दि.२८/०२/२०२२
ह.भ.प.वैजनाथ महाराज थोरात(विनोदाणार्य)
जागर-टाकळी काझी भजनी मंडळ,
मंगळवार दि.०१/०३/२०२२
ह.भ.प.महंमद रामकृष्ण
महाराज आव्हाड (विठ्ठलगड) सकाळी १०ते १२ 
जागर-शिराढोण भजनी मंडळ,
मंगळवार दि.०१/०३/२०२२
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज
कदम (आळंदी)  
जागर-शिराढोण भजनी मंडळ,
बुधवार दि.०२/०३/२०२२
ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले
(अध्यक्ष-गाथा मंदिर देहु)
सकाळी-१० ते १२ काल्याचे किर्तन
जागर-नारायणडोहो भजनी मंडळ.
बुधवार दिनांक २ मार्च २२ रोजी हरी भक्त पारायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे .

कोरोनाचे सर्व नियम पाळुन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील ऊकडगाव, मांडवा, चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण, मदडगाव, टाकळी काझी, कोळेवाडी, सारोळा बद्दी, निंबोडी, दरेवाडी, वाकोडी, वाळुंज, पारगाव,  शिराढोण आदी गावातील भाविकांनी या ज्ञानामृताचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र नारायण डोहो गड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
close