शिर्डी । प्रतिनिधी :
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने काल (दि.२१ ) रोजी बँकेचे महाव्यवस्थापक राजेशकुमार,उप महाव्यवस्थापक रविकुमार वर्मा,क्षेत्रीय प्रबंधक विनोद कुमार यांचे उपस्थितीत हॉटेल टेम्पल व्ह्यू येथे केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या संदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.याप्रंसगी बोलताना नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले.
या चर्चासत्रात शिर्डीतील विविध हॉटेल्सचे मालक व प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून केंद्र शासन व टाटा उद्योग समूह व स्टेट बँकेचे सयुंक्त विद्यमाने उर्जा बचतीचे स्रोत म्हणून सोलर पावर बसविणेकामी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या योजनेचा शिर्डीतील सर्वच हॉटेल,हॉस्पिटल इतर व्यवसायिकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन मा नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केले.यावेळी स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक मा.राजेशकुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि,शिर्डीतील सर्व हॉटेल इतर व्यवसायिकांनी या कर्ज सुविधेचा लाभ घेऊन शिर्डी शहर हे ग्रीन शहर म्हणून आपल्या माध्यमातून नावारूपाला यावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, सुजित गोंदकर, बाळासाहेब ओस्तवाल, तानाजी गोंदकर सुनिल गोंदकर,अमित शेळके, अमोल कोते,प्रशांत कोते, गणेश गोंदकर,सत्यजित गोंदकर,श्रीराम कोते,केतन कोते,विक्रांत संकलेचा,सचिन जगताप,एस व्ही.पवार साहेब,रमेश गोडगे आदींसह विविध हॉटेल्सचे प्रतिनिधी व बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिर्डी शाखेचे व्यवस्थापक निलेश नगराळे यांनी केले व अश्लेषा हुमणे यांनी आभार मानले.

