प्रतिनिधी : संजय भापकर
गुंडेगाव : २३ / गुंडेगाव येथे रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती साजरी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसंरपच संतोष भापकर, दादासाहेब दरेकर, शरद बोठे बबनराव हराळ पाटील, माजी उपसंरपच मंगेश हराळ यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन केले . ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, सतिश चौधरी,राहुल चौधरी, संजय भापकर अध्यक्ष शेखर हराळ यांच्या उपस्थितीत झाले.
अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक व डॉ.विलास सकट याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे दुसरं वर्ष होते. शिबिरात ५६ जणांनी रक्तदान केले व १०८ जणांनी नेत्र तपासणी केली. मोफत रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मत याप्रसंगी अभिलाष घिगे, संतोष भापकर यांनी व्यक्त केले.
अहमदनगर सिव्हिल ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. सामाजिक उपक्रमाचे संयोजन रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संतोष कोतकर, डॉ.विलास सकट, प्रदिप भापकर, भवानी प्रसाद चुंबळकर, स्वप्निल भापकर, सचिन जाधव,यश चौधरी, ज्ञानदेव हराळ, सोनु हराळ, बाबा कोतकर, विकास शिर्के,मनोज येठेकर, तुकाराम भापकर, दिपक सकट,मनोज धावडे आदींनी केले.
तसेच शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने गुंडेगाव येथे स्वाभिमानी प्रतिष्ठान कासार मळा याच्या वतीने ६५ फुटी भगव्या झेंडाचे पुजा व आनावरण माजी मंत्री शिवाजी कर्डिले याच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पारंपारीक मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कासार, श्यामराव कासार, युवा उद्योगजक रविंद्र कासार, सचिन माने, विजय कासार ,भाऊसाहेब कासार, राजेंद्र कासार, शिवाजी कासार, एकनाथ कासार, सागर कासार अदि शिवभक्त उपस्थितीत होते. व धावडेवाडी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कै.राजाराम हराळ यांच्या स्मरणार्थ अनिल हराळ यांच्या सहकार्याने ७५ फुटी भगव्या झेंडा उभारण्यात आला आहे .
यावेळी माजी जिल्हा परिषद बाळासाहेब हराळ,उपसंरपच संतोष भापकर, माजी संरपच संजय कोतकर, पो.कॉ.अनिल हराळ, चेअरमन सुनील हराळ, पंडीत हराळ,डॉ.गजानन भापकर, माजी उपसंरपच सुनील भापकर, बबनराव हराळ, सतिश चौधरी, रघुनाथ धावडे,महेश धावडे, संदिप भापकर,सुहास धावडे, तुषार धावडे, महेंद्र धावडे, दादा साहेब आगळे, अदि ग्रांमस्थ उपस्थितीत होते.

