shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुप्रसिद्ध सराफ अनिरुद्ध ज्वेलर्स चोरीतील आरोपींचा त्वरीत तपास लावावा..!सुवर्णकार समाजाचे पोलिसांना निवेदन..!!


श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - येथील अनिरुद्ध ज्वेलर्स मधील चोरीच्या घटनेचा तपास करुन संबंधित चोरांना त्वरित जेरबंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर सुवर्णकार समाजाच्यावतीने सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे यांच्या हस्ते श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना देण्यात आले.

सविस्तर असे की, वडाळा महादेव येथील सुप्रसिद्ध सराफ अनिरुद्ध नारायणराव महाले यांचे येथील श्रीराम मंदिर रोड,लोणार गल्ली या ठिकाणी अनिरुद्ध ज्वेलर्स हे सराफ दुकान आहे. 

सदर दुकान मंगळवार दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील अंदाजे पाच ते सहा किलो चांदी लंपास केली. सदर ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलीस व गुन्हे शाखा अहमदनगर यांनी येवून पाहणी करत घडलेल्या घटनेची माहिती घेवून तपास सुरू केला आहे.सदरील चोरीच्या घटनेमुळे सुवर्णकार समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी त्वरित या चोरीच्या घटनेचा लक्षपूर्वक तपास करत चोरांना त्वरित जेरबंद करुन सुवर्णकार समाजास न्याय द्यावा असेही या निवेदनात म्हटले आहे.

श्रीरामपूर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे यांच्या नेतृत्वाखाली सदरील निवेदन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांना देण्यात आले असून याप्रसंगी मा.नगरसेवक दिलीप नागरे,अध्यक्ष स्वामीराज कुलथे, अनिरुद्ध महाले, प्रमोद लोळगे, मंगेश लोळगे, निखिल नागरे, मनोज चिंतामणी, संतोष उदावंत, सतीष नागरे,गणेश मुंडलिक, सचिन मुंडलिक, राजेंद्र बोऱ्हाडे, संतोष चापानेरकर,संजय कुलथे, गजानन मुंडलिक, संजय कपिले, महेश महाले,स्वप्नील सोनार व समस्त श्रीरामपूर सराफ सुवर्णकार समाज,श्रीरामपूर उपस्थित होते.
close