प्रतिनिधी : आसावरी वायकर
लातुर : २८ / श्री.दि.जैन सैतवाळ सेवा मंडळ
सोलापूर, संचालित जैन वधू-वर सूचक समिती आणि भ.महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 38 वा वधू-वर पालक परिचय मेळावा,रविवार दि . 15/5/2022 रोजी लातूर येथे मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित केला आहे.
या संदर्भात वरील दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक लातूर येथे घेण्यात आली. रविवार दि . 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत राजीवजी बुबणे यांची मेळाव्याच्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या बैठकीस किशोरजी जैन, उपाध्यक्ष रवींद्रजी कटके, सचिव शैलेशजी पांगळ, कार्यकारी मंडळ सदस्य सूर्यकांतजी जामगावकर, जीवनसाथी मासिकाचे उपसंपादक अरुणजी धुमाळ,
कार्यकर्ते नंदकुमारजी कंगळे उपस्थित होते.

