विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी तंत्रज्ञान निर्माते बना - उत्तम फडतरे.
बाबासाहेब फडतरे पॉलीटेक्निक मध्ये २०२१चे बक्षीस वितरण.
इंदापूर प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी तंत्रज्ञान निर्माते बना असा बहुमूल्य कानमंत्र फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कळंब वालचंदनगर तालुका इंदापूर यांच्या माध्यमातून पुणे ,सोलापूर व सातारा जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये टॅलेंट हंन्ट या स्पर्धेचे आयोजन केले होते. या २०२१चे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.
कळंब वालचंदनगर फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कळंब वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे च्या माध्यमातून पुणे ,सोलापूर व सातारा जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये टॅलेंट हंट २०२१ चे आयोजन केले गेले होते. स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष होते. या परीक्षेसाठी तीन जिल्ह्यातील ७५ शाळांनी सहभाग नोंदविला होता.
या परीक्षेमधून डॉ. बी. जे. दाते प्रशाला नातेपुते येथील विद्यार्थी एकतपुरे शुभम तानाजी, श्री व्येंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब चा विद्यार्थी किर्दक तेजस संजय ,आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती येथील भरणे शुभम गणेश, श्रीनाथ विद्यालय वडापुरी चा विद्यार्थी मिसाळ सोनल आनंद, श्री छत्रपती इंग्लिश मीडियम भवानीनगर चा विद्यार्थी कांबळे सिद्धी संतोष त्याचप्रमाणे श्री काटे श्वर विद्यालय काटी येथील विद्यार्थी वाघमोडे प्रतिक कुमार या शाळेतील विद्यार्थ्यांनी सदरील परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून यश प्राप्त केले. तसेच इतर प्रत्येक शाळेतील प्रथम विद्यार्थ्यास ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बारामती येथील करिअर मार्गदर्शक प्रा. मनोज वाबळे सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची आवड ओळखून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक करियर मध्ये विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे तसेच संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी तंत्रज्ञान निर्माते बना असा बहुमूल्य कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला तसेच पॉलीटेक्निक प्राचार्य नागेश ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे भविष्यातील महत्व ओळखून करिअर निवडावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विकास खारतोडे यांनी काम पाहिले तसेच कार्यक्रमासाठी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य श्री कृष्णा ढेकळे सर तसेच व्येंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम चे प्राचार्य श्री विजय रॉबर्ट हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सौ. गायकवाड ज्योती मॅडम यांनी केले.

