प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १५ / करमाळा तालुका शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ओम महिला कला क्रिडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांच्यावतीने खास महिलांसाठी मोफत गर्भाशय तपासणी शिबिर आयोजित केले आहे. ही तपासणी डिजिटल व्हिडिओ कॉल्पोस्कोप द्वारे तज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. ही डिजिटल तपासणी अत्याधुनिक मशीन द्वारे केली जाणार आहे. यात गर्भाशयाचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे की नाही हे समजणार आहे.
ही तपासणी साधी न दुखणारी तपासणी आहे. अंगावरुन पांढरे जाणे , रक्त स्राव बंद न होणे, गर्भनिरोधक गोळ्याचे जास्त सेवन झाले असेल तर ,३० पेक्षा जास्त वय असेल तर अशा अनेक कारणांसाठी ही तपासणी आवश्यक आहे.
दि.१६/२/२२ बुधवार .दु.१-५
या वेळेत कृष्णा हॉस्पिटल.( डॉ.कविता कांबळे) राशिनपेठ करमाळा येथे हे शिबीर आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला संयोजकांनी केले आहे.

