प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
कोरेगाव :१५ / अहमदनगर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्री .साती साकळाई देवी यात्रा गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती.परंतु या वर्षी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की यंदा दि . १६ व १७ फेब्रुवारी रोजी होणारी श्री साकळाई देवीची यात्रा साजरी करावी व धार्मिक विधीने मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय यात्रा कमिटी व कोरेगाव ग्रामस्थांनी घेतला आहे.
दोन वर्षांपासून कोरोना महामारी असल्याने यात्रा रद्द केली गेली होती. परंतु यंदा तरी यात्रा उत्सव व्हावा अशी भाविकांसह ग्रामस्थांची मागणी होती.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता सर्व नियम पाळून या वर्षी धार्मिक विधीने यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान साकळाई यात्रा काळात यात्रेसाठी गावातील तसेच आसपासच्या परिसरातील अनेक व्यक्ती नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांमुळे बाहेरगावी असणारे प्रत्येक नागरिक वेळ काढून यात्रेसाठी साकळाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.तसेच या दिवशी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात, साकळाई डोंगरावर येण्याचा मोह भाविकांना व नागरिकांना आवरत नाही. या साकळाई यात्रेनिमित्त अनेक फिरते व्यापारी यात्रेसाठी आपलं दुकान थाटतात अशा यात्रेंवर छोटे मोठे व्यवसाय अवलंबून असतात त्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यापारी मालाची साठवणूक करून मोठी गुंतवणूक करत असतात.मात्र गेल्या दोन वर्षांपासून ह्या यात्रा बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना त्यांनाही यात्रेचा फायदा होणार आहे.
आज अहमदनगर जिल्ह्यातील हे ठिकाण नावारूपाला येत आहे.येथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.तसेच येणाऱ्या काळामध्ये हा कोरोनाचा संकट काळ संपल्यानंतर तितक्याच उत्साहाने एकोप्याने उत्सव साजरे केले जातील असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी उत्तम नियोजन करून केवळ पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत विधीवत पुजा करुन देवस्थान परिसरात कसलीही गर्दी होणार नाही.याची काळजी घेतली आहे.आणि एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
(श्री.ज्ञानेश्वर कवडे,सरपंच कोरेगाव, श्रीगोंदा)

