प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
केज नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या आज बिनवीरोध निवडी जाहीर झाल्या. अध्यक्षपदी सीता बनसोड तर उपाध्यक्षपदी शितल दांगट यांच्या निवडी जाहीर झाल्या. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी एकच आनंदोत्सव साजरा केला. हारुण इनामदार यांनी या निवडणुकीत जनविकास परिवर्तन आघाडी स्थापन करत नगरपंचायतवर आपला झेंडा फडकविला.
केज नगरपंचायत निवडणुकीत जनविकास आघाडीचे हारुण इनामदार हे बाजीगर ठरले. त्यांच्या आघाडीला ८ जागा मिळाल्या. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला केवळ ३ जागेवर समाधान मानावे लागले. निकालानंतर आघाडीसोबत कॉंग्रेस पक्ष सोबत आला. अध्यक्षपद जनविकास आघाडीला देण्याचे ठरले. त्यानुसार जनविकास आघाडीच्या वतीने सिता बनसोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात दुसरा कोणाचाही अर्ज आला नव्हता. आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या. बिनविरोधपणे सीता बनसोड यांच्या नावाची घोषणा झाली तर उपाध्यक्षपदी शितल दांगट यांची निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद झाडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निता अंधारे यांनी काम पाहिले. यी निवडी जाहीर झाल्यानंतर केज शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. व जागोजागी त्यांचे जंगि स्वागत करण्यात आले.
जनविकास परिवर्तन आघाडीचे हारून इनामदार, अंकुश इंगळे, दिलिप गुळभिले तसेच मार्गदर्शक रमेश आडसकर व काॅंग्रेसचे आदित्य पाटील, पशुपतिनाथ दांगट पाटील व मार्गदर्शक रजनीताई पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकारि यांचे स्वागत करून केजच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

