shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांच्या कोपी वर जाऊन पल्स पोलिओ लसीकरणचा शुभारंभ .

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांच्या कोपी वर जाऊन पल्स पोलिओ लसीकरणचा शुभारंभ .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येत असून इंदापूर तालुक्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी लासुर्ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तालुकास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी  रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई पाटील, प्रताप पाटील, कांतीलाल जामदार,  सरपंच सागर पाटील, शुभम निंबाळकर ,सचिन सपकळ, सारिकाताई लोंढे, पंचायत समिती सदस्य शैलजाताई फडतरे, सागर मिसाळ,  दीपक लोंढे, संतोष लोंढे, हर्षवर्धन लोंढे, निखील भोसले, अमित चव्हाण इत्यादी मान्यवर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व डॉ. दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जीवन सरतापे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण देशपांडे, प्राथमिक आरोग्य लासुरणे डॉ.दिपाली कोकरे, डॉ.लोंढे मॅडम आरोग्य सहाय्यक चोरमले बी आर ,आरोग्य सहाय्यक इंगळे एम एन व सर्व स्टाफ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


 यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर येथील ऊस तोडणी कामगारांच्या कोपी वर जाऊन मजुरांच्या लहान मुलांना पल्स पोलिओ लसीकरण देण्याचाही शुभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ऊसतोड मजुरांच्या लहान मुलांना स्वतः पल्स पोलिओ लसीची मात्रा दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यात रविवारी २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवली जात आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे. तालुक्यातील पाच वर्षाखालील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. त्यात सोबत या वर्षाच्या मोहिमेत १ कोटी १५ लाख मुलांना पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
close