पडस्थळ येथे महेंद्र रेडके यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.
इंदापूर प्रतिनिधी: २७ फेब्रु. २०२२ रोजी संपूर्ण राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी ही लसीकरण मोहीम एकाच सत्रात राबविण्यात येणार आहे. इंदापूर तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या हस्ते पडस्थळ येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना रेडके म्हणाले की ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लस देणे बंधनकारक आहे. यासाठी इंदापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. इंदापूर तालुक्यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची संख्या ३३५८२ आहे. यामध्ये ऊस तोडणी कामगार व इतर क्षेत्रातील कामगारांमुळे बालकांची संख्या वाढत आहे. त्यांचाही विचार करून या बालकांना पोलिओ लस देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. ० ते ५ वर्ष वयोगटातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.
इंदापूर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४५ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्र अंतर्गत ३४८ बुथ आहेत. तसेच १३ फिरते मोबाईल लसीकरण व्ह्यान द्वारे ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
यावेळी पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा बंगेरा, डॉ. प्रीती चामले, श्री एन एम माने. (आरोग्य पर्येवेक्षक) पिंपरी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, श्रीमती रोहिणी म्हेत्रे, वर्षा मुसळे, सिंधुताई कोकरे,श्री.श्याम कांबळे, इत्यादी उपस्थित होते.

