shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यक्तिमत्त्व विकासासाठी संमोहन काळाची गरज - संमोहन तज्ञ डॉक्टर दत्तात्रय भोसले.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी संमोहन काळाची गरज - संमोहन तज्ञ डॉक्टर दत्तात्रय भोसले.
इंदापूर प्रतिनिधी:नीरा- नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयांमध्ये प्राचार्य रविराज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संमोहनाचा कार्यक्रम(दिनांक २६ फेब्रुवारी) घेण्यात आला. 

यावेळी डॉक्टर भोसले यांनी वेगवेगळे अनेक प्रकारे संमोहनाचे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये असलेले परीक्षेविषयी चे ताण-तणाव, टेन्शन शाळेची व परीक्षेची भीती यावर विविध प्रयोग केले व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण करून सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संमोहनाची गरज असते हे त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून दिले.

या कार्यक्रमाप्रसंगी नीरा नरसिंहपूर गावचे माजी सरपंच नरहरी काळे, सरपंच सौ. अश्विनी चंद्रकांत सरवदे, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, ग्रामपंचायत सदस्य आनंद काकडे, नितीन सरवदे,विजय सरवदे, शंभू कोळी, गोपाल कोरे, प्रशांत बादले, उमेश कोळी , प्राचार्य रविराज काकडे, उपप्राचार्य राजेंद्र मोहिते, इन्चार्ज अतुल हावळे, महादेव मिसाळ, यशवंत मोहिते, प्रकाश कांबळे, भारत येडे, अविनाश शिंदे, तुषार गोखले, रणजीत कारंडे ,भारत साठे, विनायक भोसले, सुप्रिया काकडे ,सुनंदा काकडे, अनुराधा कोळी ,प्रवीण तांबोळी, रूपाली वाघमोडे, अमृता निंबाळकर, सुप्रिया कांबळे शितल सूर्यवंशी, करिष्मा कारंडे ,पूनम बळवंतराव, मनीषा बळवंतराव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
close