महाविकास आघाडीचे आमदार खासदार आणि मंत्री यांनी केले धरणे आंदोलन
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २७ / महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ नगरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. शनिवार दि . २६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदीप वर्पे, घनशाम शेलार, संजय कोळगे, शिवशंकर राजळे, दीप चव्हाण, माणिकराव विधाते, ज्ञानदेव वाफारे,
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र कोठारी, राजेंद्र दळवी, अविनाश घुले, संजय चोपडा यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री ना.नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी मंत्री मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप धरणे आंदोलनावेळी करण्यात आला. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत हे पाहता या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडी मार्फत करण्यात आला .

