प्रतिनिधी : संजय भापकर
गुंडेगाव : २७ / जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलिओ निर्मुलन मोहिमे अंतर्गत नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे आरोग्य उपकेंद्र, हराळ मळा, चौधरवाडी या बुथ वर प्रातिनिधीक स्वरुपात पल्स पोलिओ मोहिमेचे उदघाटन सरपंच मंगलताई सकट , उपसरपंच संतोष भापकर, सतिश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गुंडेगाव उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली चव्हाण,डॉ .विलास दाताळ , अंकराम वाय,एन सामाजिक कार्यकर्ते संतोष सकट, श्रीमती शशिकला भापकर, डॉ.विलास सकट, पत्रकार संजय भापकर , शहाजी भापकर ,रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष शेखर हराळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम महत्वाची मोहीम असून आपल्या घरातील आणि परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बूथवर नेऊन लस पाजून घेण्यात यावी असे आवाहन सतिश चौधरी यांनी यावेळी केले.
आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध योजना या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतोच याबाबत त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी नागरिकांना उपसंरपच संतोष भापकर यांनी आवाहन केले.काही कारणास्तव लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांनाही डोस दिला जाणार आहे असे वैद्यकीय अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
या मोहिमेत आशा सेविका कविता कुताळ,मनिषा कुताळ ,प्रिती भापकर ,रत्नाबाई बुद्धिवंत अंगणवाडी सेविका कांचन भापकर ,रेखा भापकर यांनी सहभाग नोंदवला आहे.

