शिर्डी । प्रतिनिधी ::
शिर्डी येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमलाकर कोते यांच्या पुणतांबा येथील शेतीतून शेतीला पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेले सुमारे सोळा हजार रुपये किमतीचे स्पिंगलर अज्ञात चोरट्यांनी रात्री चोरून नेल्याची फिर्याद राहाता पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कमलाकर गणपतराव कोते यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, राहता तालुक्यातील पुणतांबा शिवारात गट नंबर 428/ 2 मध्ये आमच्या मालकी हक्काची सोळा एकर शेत जमीन असून या शेत जमिनीत सध्या गहू पीक आहे. या गहू पिकाला पाणी देण्यासाठी संदीप रंगनाथ आढाव यास कामाला ठेवले आहे त्याने 10 फेब्रुवारी रोजी दिवसभर गव्हाला पाणी दिले मात्र तो आज 11 फेब्रुवारी रोजी सकाळी परत शेतात गेल्यानंतर त्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर दिसून आले नाही.
त्यांनी आपला मालक कमलाकर कोते यांना ही माहिती फोनवरून दिली त्यानंतर कोते यांनी शेतामध्ये जाऊन पाहिले असता ते दिसून आले नाही ते रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सकृतदर्शनी लक्षात आल्यानंतर कमलाकर कोते यांनी राहता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 54/22 नुसार भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राहता पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलिस करत आहेत.

