shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा ;वाईन्सची विक्री शेतकर्यांच्या हितासाठीच -राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   

 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा ;वाईन्सची विक्री शेतकर्यांच्या हितासाठीच -राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील..!!

अहमदनगर : राज्यात द्राक्ष फळबागेखालील क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, हि शासनाची भूमिका आहे.
       गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नगर शहराच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहराध्यक्ष माणिक विधाते, घनश्‍याम शेलार आदी उपस्थित होत्या.
गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, न्याय पालिका आणि विधानमंडळ यांना राज्यघटनेने काही सीमा रेषा आखून दिलेल्या आहेत. यामुळे विधानमंडळ आणि संसदेत घेतलेल्या निर्णया विरोधात शक्‍यतो न्यायालयात जाऊ नये आणि न्यायालयाने त्याची किती दखल घ्यावी.

याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. न्यायपालिका आणि विधानमंडळ या दोघांच्या हक्कांच्या संरक्षणाचा प्रश्‍न असल्याने सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबन रद्द केल्याच्या निर्णयावर विधानमंडळ म्हणून आता काय भूमिका घेतली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार असे ते म्हणाले.
न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे. मात्र, या निर्णयाची पूर्णप्रत आल्यानंतर सविस्तरपणे भाष्य करता येईल. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले असले तरी विधानमंडळाने त्यावेळी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. तो एका व्यक्तीने घेतलेला निर्णय नव्हता. यापूर्वी देखील असे प्रसंग घडलेले आहेत. 
देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत राज्यातील द्राक्षांचा खप कमी आहे. यामुळे अनेकांनी वायनरी टाकलेल्या आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या मॉलमध्ये छोट्याशा जागेत त्याची विक्रीला परवानगी आहे. 

किरकोळ किराणा दुकानात अशी विक्री करता येणार आहे, असे सांगत राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयाचे निर्णयाचे समर्थन केले. तसेच वाईन विक्रीतून राज्याच्या महसूलात वाढ होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close