शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
शिक्षक बँकेतील घडामोडीने राजकीय वातावरण तापले..!!
अहमदनगर : शिक्षक बँकेत संगणक व सीसीटीव्ही खरेदीमुळे बँकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. संचालक मंडळासह काही संघटना आक्रमक झालेल्या असून या विरोधात सर्वांनी लढा उभारला आहे.
गेली दोन दिवस वर्तमानपत्रात ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिक्षक बँकेचे संगणक खरेदी सीसीटीव्ही कॅमेरे व सायरन बसवणे यांच्या निविदा मागविण्यात संदर्भात जाहिरात आल्या.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील घडामोडीवरून आता चांगलेच वातावरण तापले आहे. यावरून आता संचालक मंडळावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. इतरही नेते मंडळी नाराजी व्यक्त करीत आहेत.
मात्र यावर अद्याप बँक व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र संगणक अद्यावत असणे गरजेचे आहे. बँकेतील संगणक किती वर्षांचे झालेले आहेत. हे बँक व्यवस्थापनाने सभासदांसमोर मांडणे गरजेचे आहे.
राज्यात अनेक भागात बँका व पतसंस्थांमध्ये चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक बँकेच्या मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील शाखांमध्ये सीसीटीव्ही अद्यावत बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र हा निर्णय का योग्य आहे, हो मात्र संचालक मंडळ सभासद व विरोधकांना सांगण्यात अपयशी ठरलेले दिसून येत आहे. त्यामुळे सगळा गोंधळ उडालेला आहे, अशी चर्चा सुरु आहे.
बँकेतील कारभाराबाबत व्यक्त होत असलेल्या संशयावर वरिष्ठ नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करून हा गोंधळ निर्माण झालेला मिटविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

